सभापती भगवानशेठ पोखरकर यांनी नायफड येथील जळीतग्रस्त कुटूंबाला जीवनावश्यक साहित्याची केली मदत

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील नायफड येथील शेतकरी खेमा रामजी तिटकारे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या कुटुंबाला खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी जीवनावश्यक साहित्य, किराणा देऊन मदत केली. ही मदत गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी माजी सभापती अंकुश राक्षे, आदिवासी विकास प्रकल्पाचे समन्वयक गणेश गावडे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्रीनाथ लांडे, मंदोशीचे सरपंच बबन गोडे, भोमाळेचे सरपंच सुधीर भोमाळे, धुवोलीचे सरपंच शरद जठार, अंकुश शिंदे, रणधिर सुर्वे, ग्रामसेवक राजाराम रणपिसे उपस्थित होते.

खेमा तिटकारे हे सोमवारी( दि.२) रोजी शेतात कुटुंबीयांसोबत भात गेले काढण्यासाठी असताना घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. तिटकारे यांचा या घटनेने संसार उघड्यावर आला. या कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून खेड पंचायत सभापती भगवान पोखरकर यांनी जीवनावश्यक वस्तू व किराणा देऊन मदत केली आहे.तसेच या कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी मदत करण्यात येईल असे सभापती भगवानशेठ पोखरकर यांनी सांगितले.

Previous articleनारायणगाव उपबाजार समितीच्या आवारात दोन गटांत लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी तुफान हाणामारी
Next articleपारगाव येथे अवैधरित्या दारुची विक्री करणार्‍यावर पोलिसांची कारवाई