पारगाव येथे अवैधरित्या दारुची विक्री करणार्‍यावर पोलिसांची कारवाई

Ad 1

प्रमोद दांगट आंबेगाव

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारगाव शिंगवे (ता, आंबेगाव )येथील शिंगवे फाटा येथे दारूची विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून दारूविक्री करणाऱ्याला मालासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार (दि, ३) रोजी रात्रीची गस्त घालत असताना मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना बातमीदारा मार्फत शिंगवे फाटा परिसरात एक व्यक्ती हॉटेल रानवारा च्या पाठीमागे पत्र्याच्या शेड मध्ये अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी दोन पंच व पोलीस स्टाफ घेऊन त्याठिकाणी जाऊन कारवाई केली. त्यांनी घटनास्थळावर जाऊन छापा मारला त्यावेळी अतुल ढोबळे (वय २७ रा.पारगाव,ता.आंबेगाव जि. पुणे) ही व्यक्ती बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याचे आढळून आले पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळील ११,२१४ रुपयांचा देशी विदेशी दारूचा माल ताब्यात घेतला आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन माताडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहे.