गोपाळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन;कोरोनावर मात करण्यासाठी तरुणांची एकजूट

Ad 1

दिनेश पवार,दौंड

गोपाळवाडी येथे तरुणांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विठ्ठल होले यांनी सांगितले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता रक्त संकलन होणे गरजेचे असल्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी लॉक डाऊन काळात 9 एप्रिल रोजी शिबिर आयोजित केले होते.

यावेळी गावातील तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.81 तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली होती,त्या शिबिराचे उदघाटन तत्कालीन DYSP ऐश्वर्या शर्मा यांनी केले होते,दौंड येथील रोटरी ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले, यावेळी 40 तरुणांनी रक्तदान केले आहे,सर्व रक्तदात्यांना विठ्ठल होले यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि 16 gb पेनड्राइव्ह देण्यात आले.

कार्यक्रमाला रिटायर पीएसआय बाळासाहेब गिरमे, सुनिल तरटे,संतोष होले उपस्थित होते,तर रोटरी क्लबचे स्वप्नील शिंदे,प्रशांत मोहन, विकी पाटील,. जयश्री माखनकर, दिपाली सिंग,सोनाली ओव्हाळ,रोहित वाघमारे,आकाश पाडळे यांच्या सहकार्याने शिबीर संपन्न झाले.विठ्ठल होले यांनी सर्व तरुणांचे व रोटरी ब्लड बँक यांचे आभार मानले.