गुन्हेगारी,समाजविघातक प्रवृत्तीना धडा शिकवणार-पोलीस निरीक्षक नारायण पवार

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी दौंड पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वीकारली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याप्रमाणे माझी कार्याची पद्धत आहे,मी सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांचा नाश करण्याबरोबरच,जिविताचे रक्षण,मालमत्तेचे रक्षण, सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या आधारे न्याय देण्यावरती भर देतो,दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी,अवैध धंदे मोडीत काढून, समाजविघातक प्रवृत्तीना धडा शिकवणार तसेच जे वारंवार गुन्हे करतात आशा गुन्हेगार प्रवृत्तीवर तडीपार व कठोर कारवाई करणार त्यांना पाठीशी घालणाऱ्यावरही कारवाई करणार असल्याचे मत व्यक्त केले.

पोलीस निरीक्षक पवार यांनी गडचिरोली,सातारा,पुणे ग्रामीण, रायगड,या जिल्ह्यात काम केले आहे,त्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्धल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे, गडचिरोली येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे खडतर सेवा पदक व इतर दोनशे ते तीनशे बक्षिसे मिळाली आहे,परिसरातून सर्व स्तरातून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous articleगोपाळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन;कोरोनावर मात करण्यासाठी तरुणांची एकजूट
Next articleआळंदीतील महाराष्ट्र सैनिकांचे राजसाहेबांकडून कौतुक