देऊळगाव राजे येथे कोरोना योद्धाचां सन्मान

Ad 1

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथे राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत यांच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर, पोलीस,पोलीस पाटील, ग्रामसेवक,मेडिकल चालक, कोतवाल, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, पत्रकार, समाजसुधारक आदींचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय महासचिव रमेशजी गणगे,प्रदेश युवा अध्यक्ष- बाळासाहेब मदने,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दिपक खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला, यावेळी मा.सरपंच अमितदादा गिरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,पोलीस पाटील सचिन पोळ,सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत सूर्यवंशी, पोपटभाऊ खोसरे,अभिमन्यू गिरमकर,आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष कदम यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा केले महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक खैरे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार चे कार्य यांचा उल्लेख केला तर महासचिव रमेश गणगे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार च्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणार असल्याचे सांगितले, कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष दस्तगिर इनामदार, दौंड तालुका कार्याध्यक्ष समीर काळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कोल्हे सुभाष कदम यांनी केले होते,सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले