कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांची शेवटच्या दिवशी देखील प्रभावी कामगिरी

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनमध्ये गेली अडीच वर्षांपासून कर्तव्यावर असणारे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला आहे, अगदी शेवटच्या दिवशी सुध्दा एका महत्वाच्या गुन्ह्याचा शोध लावून कर्तव्य पार केले आहे,सुनील महाडिक यांनी अडीच वर्षांपासून ची दौंडकरांसाठी केलेली सेवा व अनुभव व्यक्त केले आहे,

गेले दीड महिन्यापासून लिंगाळी माळवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एक ऊस चारा पिका चे विक्री करणारा आप्पा उत्तम गावडे वय 35 वर्षे धंदा पिकअप चालक राहणार भोलोबा वाडी कौठडी तालुका दौंड पळवून घेऊन गेला होता सदरचे प्रकरण अतिशय संवेदनशील झालेले होते सदर प्रकरणांमध्ये नीलम ताई गोरे यांनी सुद्धा पाठपुरावा सुरू केला होता सदर चा आरोपी खेड्यामध्ये फलटण परिसरामध्ये लपवून बसला होता सोबत अल्पवयीन मुलगी सुद्धा होती मोबाईल किंवा इतर कोणत्याही तांत्रिक पुरावा मागे राहू नये म्हणून तो कोणत्याही मोबाईलचा वापर करत नव्हता नातेवाईक मित्रपरिवार यापासून गेले दिड महिना तो संपर्कात नव्हता दौंड पोलिसांनी करमाळा बारामती इंदापूर दौंड हा परिसर अक्षरशः पिंजून काढला होता माननीय विशेष पोलिस अधीक्षक यांनी सुद्धा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता पोलिसांच्या वर दबाव वाढत असताना केवळ जनसंपर्क असल्यामुळे पोलिसांना सदर आरोपी अल्पवयीन मुलीसह फलटणच्या ग्रामीण दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली त्यावेळी सदर ठिकाणी भल्या पहाटे दौंड पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचारी यांनी छापा मारून सदर आरोपी याला ताब्यात घेतले सदर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सुद्धा तपासात निष्पन्न झालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास दबाव वाढत असताना पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक अमृता काटे पोलीस नाईक दाभाडे पोलिस कर्मचारी राजीव बने यांनी केलेला आहे.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा आज दौंड पोलीस स्टेशन चा शेवटचा दिवस असताना हे महत्वपूर्ण गुन्हा उघड झालेला आहे गेल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये मळद येथील दरोडा सहा खून तसेच हायवेवरील चाळीस लाखाचे लूट तसेच दौंडमधील छोट्या-मोठ्या पाच जबरी चोऱ्या 2019 चा दौंड शहरातील महापूर व 2020 गेल्या महिन्यात आलेला खडकी स्वामी चिंचोली भागातील महापूर कुरकुंभ एमायडिसी नियोजन करून हाताळण्यात आलेले तीन महाभयंकर आगीच्या घटना ज्यामध्ये अनेक लोकांची जीवितहानी होऊ शकली असते परंतु केवळ सुनियोजन व इतर सर्व विभागाचे असलेले समन्वय यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ दिली नाही

लोकसभा 2019 व विधानसभा 2020 या निवडणुका कोणत्याही पद्धतीने सार्वजनिक सुव्यवस्था न बिघडता निरपेक्ष वातावरणात पार पाडल्या त्यानंतर मार्च दोन हजार वीस पासून सुरू असलेले कोरणा संकटाचा दौंड पोलिसांनी माझ्या नेतृत्वात समर्थक पणे सामना केलेला आहे इतर कोणत्याही खात्याला एक रुपयाही दंड न देणारे दौंडकर यांनी दौंड पोलिसांना जवळजवळ 25 लाख रुपयांचा दंड दिलेला आहे सर्व लोकांची अपेक्षा होते दौंड शहरांमध्ये करुणा संकट गंभीर होईल कदाचित धारावी सारखे सुद्धा परिस्थिती निर्माण होईल परंतु पोलिसांनी कडक भूमिका घेतल्यामुळे दौंड मधील करुणा कधीच वाढला नाही यासाठी वेगवेगळ्या संघटना यांनीही पोलिसांना मदत केली तसेच सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करून सर्वांपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व नियम सांगणारे मेसेज पोचले गेले त्यामुळे आज जवळजवळ कोरोना संपुष्टात आलेला आहे

कोणत्याही प्रकारचा मालमत्तेचा गुन्हा या अडीच वर्षाच्या काळामध्ये उघड व्हायचा राहिला नाही दौंड शहरातील एकूण पन्नास लोकांना तडीपार करण्यात आले दौंड शहरातील वाळू व्यावसायिक व अवैध धंदे यांच्यावर कायम अंकुश ठेवला या मधून कोणत्याही प्रकारची कायदा-सुव्यवस्थेची गोष्ट घडू दिली नाही दौंड शहरात पाठीमागील महिन्यात झालेला फोटोग्राफर भागवत यांचा खुनाचा गुन्हा जरी उघड झालेला नसला तरी सुद्धा त्याच्या माहितीच्या समिप पोलीस पोहोचले आहेत निश्चित पुढील काही दिवसात तोही गुन्हा उघड होईल या माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सर्व पत्रकार मित्रांनी मला अतिशय मोलाची साथ दिली निरपेक्षपणे पत्रकारिता करून पोलिस स्टेशनची बाजू व्यवस्थितपणे मांडली त्यामुळे जनमानसामध्ये पोलिसांची प्रतिमा निश्चितपणे सुधारली आपला सर्वांचा मी ऋणी राहील
सुनील महाडिक
पोलीस निरीक्षक
दौंड पोलीस स्टेशन

Previous articleनारायणगावात बुलेट शोरूम व गॅस एजन्सी चे शटर उचकटून सुमारे बारा लाख रुपयांचा ऐवज गेला चोरीला
Next articleराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शंभर रुपयांचा भरला दंड