नारायणगावात बुलेट शोरूम व गॅस एजन्सी चे शटर उचकटून सुमारे बारा लाख रुपयांचा ऐवज गेला चोरीला

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील शेवंताई गॅस एजंसी व एनफिल्ड बुलेट दुचाकी शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री दहा ते १ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या घटनेची फिर्याद सुदर्शन नंदकुमार बोरकर यांनी दिली. घटनेच्या फिर्यादीनुसार शेवंताई गॅस एजन्सी मधील रोख रक्कम ३ लाख ९ हजार रुपये तसेच सूर्या कंपनीच्या शेगड्या, सुरक्षा पाईप, एक एलसीडी रेगुलेटर असा ऐवज चोरीला गेला आहे.

 तसेच बुलेट शोरूम मधील पाच लाख ८२ हजार ४११ रुपये रोख रक्कम. तसेच अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर स्पेअर पार्ट असा सुमारे एकूण ११ लाख ९८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत त्यानुसार बुलेट शोरूम मध्ये दोन चोरटे शटर उचकटून घुसले असल्याचे दिसत आहे.

 या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के हे करीत असून घटनास्थळी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी भेट दिली.

Previous articleडॉ.संग्राम डांगे व डॉ.विष्णू मुंडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान
Next articleकर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांची शेवटच्या दिवशी देखील प्रभावी कामगिरी