राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शंभर रुपयांचा भरला दंड

Ad 1

पुणे: कोरोना संकटातही अनेक नेते मंडळी, नागरिक सार्वजनिक मास्क घालत नाही.जंक्शन (ता. इंदापुर) येथील खासगी कार्यक्रमात भाषण सुरु असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा तोंडावरील मास्क अनावधानाने निघाला. मात्र, त्याची जबाबदारी स्वीकारत भरणे यांनी भाषणानंतर स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड भरला.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे  जंक्शन येथील एका खासगी दुकानाच्या उद्घाटनसाठी आले होते. यावेळी भाषण करताना अनावधानाने भरणे यांच्या तोंडावरील मास्क खाली आला. मात्र, ही देखील चुक आहे. मंत्र्यांना देखील नियम बंधनकारक आहेत. याच जाणीवेतुन भाषणानंतर भरणे यांनी स्वतःहून शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरून त्याची रीतसर पावती घेतली.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तुलनेने कोरोनाच आलेख घसरत असला तरी कोरोना हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमावलीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. मास्क निघाल्याने दंड भरून हा संदेश दिला आहे.