डॉ.संग्राम डांगे व डॉ.विष्णू मुंडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

Ad 1

दिनेश पवार,दौंड

अखिल भारतीय मराठा महासंघ दौड डॉ, पानसरे हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग दौंडयांच्या वतीने डॉ संग्राम डांगे व डॉ विष्णू मुंडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

सदर प्रसंगी डॉ संग्राम डांगे यांनी डॉ पानसरे हॉस्पिटल संचलित श्री साई कोव्हिडं सेंटर चे उदघाटन करूनआपण सध्या कोविड या जागतिक महामारी बरोबर लढत आहोत ही महामारी लवकर आटोक्यात येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतच आहोत,पुणे जिल्ह्यमध्ये दौंड हा रिकव्हरी बाबत अव्वल स्थानी आहे, परंतु अशा प्रकारे डॉ सुभाष पानसरे यांनी जो काही धाडशी निर्णय घेऊन ” कोव्हिडं सेंटर ” चालू करत आहेत.

सदर हॉस्पिटलमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट, R T P C R टेस्ट केले जातील,तसेच Home quarantine पेशंटसाठी वैद्यकीय उपचारासाठी सोय केली जाणार आहे,असे डॉ सुभाष पानसरे यांनी सांगितले.

यावेळी डॉ ज्योती पानसरे, आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, विक्रम बाबा पवार, डॉ चंद्रकांत भागवत, रमेश गाडे, प्रमोद खांगल, योगेश कराळे, रोहन घोरपडे, खंडेराव जाधव, ओंकार पानसरे,ताहेर पठाण व सर्व कर्मचारी उपस्थित होते.सूत्र संचालन दुर्योधन जठार यांनी केले.