वाकळवाडीत लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Ad 1

राजगुरूनगर-संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात सापडले असताना खेड तालुक्यात शासनाच्या नियमांचा लोकप्रतिनिधींकडून पूर्णपणे फज्जा उडवला जात आहे.

वाकळवाडी सारख्या गावात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नसल्यामुळे ही वाकळवाडीकरांची जमेची बाजू आहे मात्र वाकळवाडी गावातील ठाकरवाडीवर गेलेल्या पुढाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.शासनाने दिलेल्या नियमांचे कुठलेही पालन होतांना दिसत नाही. शासनाच्या नियमांचा लोकप्रतिनिधींकडून पूर्णपणे फज्जा उडवला जात आहे.नागरिकांनी तोंडाला मास्क लावने बंधनकारक असतांना सभापती व अनेकांनांच्या तोंडाला मास्क बांधलेले दीसत नाही.

सार्वजनिक ठिकाणी जाऊन गर्दी करू नका असे शासनाने वारंवार आदेश देऊन या आदेशाला खेड तालुक्यात मात्र पंचायत समितीचे सभापती, माजी सभापती यांच्याकडुन केराची टोपली दाखवली आहे.वाकळवाडी येथील शाळेला भेट देऊन गर्दी करणाऱ्या सभापती व इतरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे

वाकळवाडी (ठाकर वस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खिडकीचे गज कापून शाळेतील संगणक चोरून नेण्यात आले होते ही घटना (दि.२८ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.

घटना घडल्यानंतर वाकळवाडी गावात शाळेत संगणकाशी चोरी झालेले पाहण्यासाठी सभापती व तालुक्यातील दहा ते बारा गावातील पुढारी व नागरिक आले होते मात्र त्यांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क लावले नव्हते तसेच कोणतेही सोशल डिस्टन्स न पाहता शाळेच्या परिसरात गर्दी केली होती. त्यांच्या या वर्तणुकीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने व बेजबाबदारपणे वागण्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे व नागरिकांनी केली आहे.