खानवटे येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

दिनेश पवार,दौंड

खानवटे (ता.दौंड) येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खानवटे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन आदिवासी विकास संघ चे युवा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश शहाजी गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले,तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पोलीस पाटील उर्मिला गायकवाड, उत्तम गायकवाड, रोहित गायकवाड, भीमराव गायकवाड, गणेश,गायकवाड, माणिक शेळके,शंकर ढवळे,विशाल मोरे,सोमनाथ गायकवाड, संदेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते

Previous article“माझे कुटुंब ,माझी जबाबदारी” योजने अंतर्गत वेगरे येथील नागरिकांची आरोग्य तपासणी
Next article“शिक्षक काॅलनी’ परिसरासाठी सर्व सेवासुविधा पुरविणार – आमदार दिलिप मोहिते पाटील