“माझे कुटुंब ,माझी जबाबदारी” योजने अंतर्गत वेगरे येथील नागरिकांची आरोग्य तपासणी

 पौंड-वेगरे (ता.मुळशी )येथे महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा शुभारंभ मुळशी तालुका शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय राजेंद्र गुंड यांच्या हस्ते प्राथमिक तपासणी करून व आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे, उपसरपंच मनिषाताई मरगळे ,पोलीस पाटील यमुना मरगळे ,आरोग्य सेवक डॉक्टर रावसाहेब खबाले (इंदापूर ),डॉक्टर साष्टे मामा, आशा कार्यकर्त्या अर्चनाताई चवले यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.


महाराष्ट्र शासनाच्या या अभियानाची गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या अभियानांतर्गत उपस्थित ग्रामस्थांची पल्सऑक्सी मीटर ,टेम्परेचर गण च्या सहाय्याने तपासणी करण्यात आली असून उर्वरित गावातील सर्व कुटुंबातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे भाऊ मरगळे यांनी सांगितले.


यावेळी पैलवान दिलीप कोळेकर ,महादेव कोकरे ,अनिल ढमाले गणपत गुंड ,धोंडीबा ढेबे , जणू मरगळे, नर्मदा गुजर, सिंधुबाई दोन्हे ,संगीता बवधने, साळाबाई बावधने, दिपाली बावधने ,सुनिता कोकरे ,मंदा बावधने, सामा बवधने , पांडुरंग मरगळे, दत्ता बबन चौधरी ,विठ्ठल मरगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleवाकळवाडी शाळेतील दोन संगणकांची चोरी
Next articleखानवटे येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी