वाकळवाडी शाळेतील दोन संगणकांची चोरी

राजगुरुनगर -वाकळवाडी (ठाकरवस्ती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे अज्ञाताने खिडकीचे गज कापून शाळेतील दोन संगणक व इतर वस्तू लंपास केल्या आहेत, ही घटना दि. २८ रोजी रात्री घडली.


वाकळवाडी गोसासी रस्त्यालगत ठाकरवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद आहेत. शााळेला ग्रामपंचायतीकडून व जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संगणक व इतर साहित्य दिले होते . सध्या याच संगणकावरुन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी शाळेचे खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश करून वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून मिळालेला इंटेल कंपनीचा एक संगणक संच व पुणे जिल्हा परिषदेकडून मिळालेला एक्सार कंपनीचा एक संगणक  संच व इतर साहित्य असे ३५ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. (दि. २९ ) रोजी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत पवळे शाळेत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेले असता, संगणक व इतर सहित्य दिसून आले नाही.

याप्रकरणी मुख्याध्यापक हनुमंत पवळे (रा. वाकळवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Previous articleनारायणगाव ग्रामपंचायतीचा खुनशी कारभार – चंद्रशेखर कोऱ्हाळे यांचा घणाघाती आरोप
Next article“माझे कुटुंब ,माझी जबाबदारी” योजने अंतर्गत वेगरे येथील नागरिकांची आरोग्य तपासणी