“शिक्षक काॅलनी’ परिसरासाठी सर्व सेवासुविधा पुरविणार – आमदार दिलिप मोहिते पाटील

Ad 1

राजगुरूनगर- वाफगाव रोडवरील शिक्षक काॅलनी, राक्षेवाडी, राजगुरुनगर (ता.खेड) परिसरास सर्व सेवा सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.राजगुरुनगर येथील वाफगाव रस्त्याशेजारी ‘शिक्षक काॅलनी’ नामकरण फलकाचे अनावरण मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.


वाफगाव-गुळाणी रोड एस.टी.स्टॅन्डच्या उत्तरेकडील ओढ्यावर पूल टाकून थेट पुणे नाशिक हायवेला लवकरच जोडणार असल्याचे मोहिते म्हणाले.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती अशोकदादा राक्षे, पोलिस पाटील पप्पूकाका राक्षे, उद्योजक धनंजयशेठ भागवत, राहुल मांजरे, गोविंद रोकडे, शिक्षकनेते धर्मराज पवळे, संदिप मिरजे, अशोक कडलग, किरणराव तांबे, मधुकर वाडेकर, भानुदास राक्षे, आशा तांबे, संतोष राक्षे, दिलीप आवारी, सुधीर रोकडे, महेश वाडेकर, राजवेद पवळे, रुद्रप्रताप मिरजे, प्रज्ञान राक्षे, आर्यनबापू तांबे आदी मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धर्मराज पवळे यांनी केले. आभार शिक्षक काॅलनीचे अध्यक्ष संदिप मिरजे यांनी मानले.

Previous articleखानवटे येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
Next articleदुसऱ्याचे घर बळकावल्यामुळे दांपत्याला अटक