अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या स्मशानभूमीचे काम मार्गी

गावातील इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळून देण्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली

राजगुरूनगर-रेटवडी (ता. खेड) येथील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे स्मशान भूमी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सदर स्मशान भूमीची पाहणी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी आज केली तत्काळ निधी उपलब्ध करून स्मशानभूमीचे काम आरसीसी मध्ये होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक शेठ घुमटकर , उपसभापती दशरथ शेठ गाडे पाटील , मा पंचायत समिती सदस्य द्वारकानाथ टिजगे , उपसरपंच नवनाथ पवार , चेअरमन शिवाजीराव वाबळे ,मा उपसरपंच नामदेव डुबे , तंटामुक्ती अध्यक्ष मंगेशशेठ वाबळे पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष किरण पवार , मा चेअरमन शिवाजीराव पवळे, शिवरामशेठ काळे , वामनराव पवळे , पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे ,उद्योजक राजुशेठ वाबळे , ग्रा सदस्य सुभाष अप्पा हिंगे , शरद काका वाबळे , सुरेशभाऊ पवार , महादू पवार संदीप बोऱ्हाडे , नवनाथ गिरी गोसावी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleदेऊळगाव राजे ते प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
Next articleनारायणगाव ग्रामपंचायतीचा खुनशी कारभार – चंद्रशेखर कोऱ्हाळे यांचा घणाघाती आरोप