देऊळगाव राजे ते प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Ad 1

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे ते प्राथमिक आरोग्य केंद्र(देऊळगाव ते बोरिबेल रस्ता) या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला, दौंड चे आमदार राहुल कुल यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, भूमिपूजन होऊन बरेच महिने होऊन देखील काम झालेले नव्हते,सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने काम चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली होती, याबाबत काम चालू करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काम चालू करण्याबाबत दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते, रस्त्याची दुरवस्था झाल्याने काम चालू करण्यासाठी मागणी होत होती, दरम्यान या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव खोसरे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी मा.सरपंच अमित गिरमकर, देऊळगाव राजे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष अनील सूर्यवंशी, वजीर इनामदार, संभाजी पोळ,महादेव गिरमकर, पत्रकार आप्पासाहेब खेडकर, जयवंत गिरमकर, रघुनाथ पोळ व ग्रामस्थ उपस्थित होते.