कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश कुंभार यांची निवड

Ad 1

दिनेश पवार,दौंड

कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य च्या दौंड तालुकाध्यक्ष पदी देऊळगाव राजे चे माजी सरपंच सुरेश मारुती कुंभार यांची निवड करण्यात आली,कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सतीश दगडू दरेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमवंशी,कार्याध्यक्ष-हेमंत खटावकर यांनी सुरेश कुंभार यांना निवडीचे पत्र दिले,या निवड झाल्याच्या निमित्ताने माजी आमदार रमेश आप्पा थोरात,पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका, देऊळगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने देऊळगाव राजे या ठिकाणी सुरेश कुंभार यांचा सन्मान करण्यात आला,यावेळी मा.सरपंच अमित गिरमकर, विष्णुपंत सूर्यवंशी, सुभाष नागवे,दत्तात्रय पाचपुते,जगन्नाथ कदम आदी उपस्थित होते

सुरेश कुंभार हे वृक्ष संवर्धन समीतीचे सदस्य,ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य आहेत, त्यांचे सामाजिक कार्य पाहून ही निवड करण्यात आली आहे,युवकांच्या कौशल्य आधारित उपक्रम,कुंभार समाजाला व्यवसाय निर्मिती करण्यासाठी तसेच या व्यवसायातील असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुरेश कुंभार यांनी सांगितले