तिन्हेवाडीत बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा

Ad 1

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे बिबट्याने एक कालवड ठार केली. ही घटना मंगळवारी (दि २७) उघडकीस आली.

तिन्हेवाडी येथील सचिन ज्ञानेश्वर आरुडे यांच्या गोठ्यात रात्री बिबट्याने कालवडीवर हल्ला करून तिला वनविभागाच्या हद्दीत नेले होते. तिचा मानेकडील भाग खाल्लेला स्थितीत होता.वनविभागाच्या हद्दीत मृत झालेली कालवड आढळुन आल्याने बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभित आहेत.