अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी- शिवशंभु छावा प्रतिष्ठान ची मागणी

Ad 1

राजगुरूनगर-गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेती पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर्ण शेतातील पिके वाया गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शिवशंभु छावा प्रतिष्ठान खेड तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना दिले आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नुकसान भरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले असून हे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी व त्याबाबतच्या सूचना तालुकास्तरावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना द्याव्यात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले आहे.