दौंड शुगरच्या गाळप हंगामाच्या उस तोडणीला सुरुवात

दिनेश पवार,दौंड

दौंड शुगरच्या यावर्षी च्या गाळप हंगामास सुरुवात करण्यात आली आहे, दौंड शुगरचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते ऊस उत्पादक राजेंद्र येडे यांच्या ऊस फडाचे पूजन करून ऊस तोडणीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक शहाजी गायकवाड, शेतकी अधिकारी दिपक वाघ,बाजार समितीचे मा.सभापती काशिनाथ जगदाळे, परिस्थितील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते,यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव त्यातच अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, यावर दिलासादायक बाब म्हणजे दौंड शुगरने सुरू केलेली ऊस तोडणी होय,यामुळे सर्व ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत तोडण्यास मदत होईल.

या वर्षीच्या गाळप हंगामात सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळत तोडून गळपाचे जे ध्येय निश्चित केले आहे ते पूर्ण करणार
संचालक वीरधवल बाबा जगदाळे

Previous articleउद्योजकाकडे पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल
Next articleदौंड मध्ये रुग्णांना फळे वाटप