राष्ट्रीय मानावाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण(भारत) च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी दिपक खैरे यांची निवड

Ad 1

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी दिपक शशिकांत खैरे यांची निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीणा यांच्या आदेशाने करण्यात आली आहे तसेच राष्ट्रीय महासचिव मेश गणगे तथा महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने यांच्या माध्यमातून दौंड तालुका अध्यक्षपदी दिपक खैरे यांची एकमताने निवड केली गेली.

दिपक खैरे हे गेली 10 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व इतर समस्या सोडवण्यासाठी मदत झाली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी आहे, युवक संघटन करून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात, तालुक्यातील व जिल्ह्यातील कामाची तत्परता पाहुन त्यांची निवड केली गेली.

तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व संपुर्ण तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.कोरोना पेशंट ची बिले कमी करुण देण्यामधे त्यांचे मोलाचे योगदान आहे त्याच प्रमाणे शेतकर्यांचे वेगवेगळे प्रश्न त्यानी सोडवलेले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील शेतकरीवर्ग व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करनार असल्याचे संगितले.

Previous article   पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वांढेकर यांच्या सन्मान
Next articleधामणे शाळेत शिष्यवृत्ती गुणवंतांचा सन्मान ! धामणे शाळेची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम