Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरूनगर-धामणे (ता.खेड) प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. ६१ वर्षानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदा शिष्यवृत्तीमध्ये येथील विद्यार्थी झळकले. शिष्यवृत्तीचा नावलौकिक सर्वदूर पसरुन हेद्रुज व पाईट परिसरातील मुलांची ओढ धामण्याकडे वाढली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत यावर्षीही धामणे शाळेचे तीन विद्यार्थी गुणवंत ठरल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.

कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद तानाजी काळोखे यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अमर केदारी व शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थी सुमेध रमेश बच्चे (गाव- हेद्रूज: शाळा-धामणे) (२६० गुण), ज्ञानेश्वरी अरुण शिवेकर (गाव-शिवे: शाळा-धामणे) (२३६ गुण) आणि पै.देविका सोमनाथ कोळेकर (कुस्ती लहान गटात खेड तालुक्यात टाॅपर बालपहिलवान) (२२८ गुण) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अंकुशराव कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच महेंद्र कोळेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगिता कोळेकर, उपाध्यक्ष संभाजी गिर्हे, माजी उपसरपंच काळूराम कोळेकर, रमेश बच्चे, शाळा बांधकाम समितीचे अध्यक्ष काळूराम गिर्हेमामा, उपाध्यक्ष किरण कोळेकर, पै. सुदाम कोळेकर, माऊली कोळेकर , शांताराम कोळेकर, गंगारामआप्पा कोळेकर, अनंथा कोळेकर, सत्यवान भोकसे, हौशिराम सातपुते, सोन्याभाऊ कोळेकर, प्रणवदादा सातपुते, शंकर कोळेकर, बबन कोळेकर, उषा कोळेकर, सुजाता बोर्हाडे, मंगल निमसे, पल्लवी कोळेकर, लिलाबाई कोळेकर आदी मर्यादित मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षिका मंगल निमसे-पिंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून चालू शिष्यवृत्ती वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुवर्य अनिल बोर्हाडे, मारुती जरे, कल्याण पिंगळे, सोपानराव कोळेकर, बाबाजी सातपुते, संतोष वाघुले आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी तानाजी काळोखे, अंकुशराव कोळेकर, गणेश बोत्रे, मारुती जरे, अमर केदारी, सुमेध बच्चे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले. आभार मंगल निमसे-पिंगळे यांनी मानले.
Download WordPress Themes Nulled and plugins.