मनसे’च्या दणक्याने, ठेकेदाराने किराणा मालाचे दिले थकीत बिल

Ad 1

चाकणः”समस्या तुमची साथ ‘मनसे’ची” अशी साद घालत सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यास तत्पर असलेल्या खेड तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी किराणा व्यावसायिक सचिन शिंगनकर यांचे गेल्या तीन महिन्यांपासून थकविलेले ४३ हजारांचे बिल ठेकेदाराकडून मिळवून दिले आहे. कुरूळी परिसरातील एका ठेकेदाराने त्याच्या कामगारांचे किराणा मालाचे उधारीचे खाते सचिन शिंगनकर यांच्या किराणा दुकानात लावले होते पण तो किराणा मालाचे बिल देण्यासाठी टाळाटाळ करत होता.सचिन शिंगनकर यांनी खेड तालुक्यातील ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत विनंती अर्ज केला होता.

संतोष काळे चाकण शहर उपाध्यक्ष, शुभम स्वामी,भरत बच्चे ,नवनाथ देवकर,मनोज पडवळ, चाकण शहर सरचिटणीस जयवंत खळे यांनी पाठपुरावा करून सचिन शिंगणकर यांना त्यांचे किराणा मालाच्या रक्कमेचा चेक शिंगणकर यांच्या पत्नीकडे ठेकेदाराने सुपूर्द केला .त्याबद्दल सचिन शिंगनकर यांनी ‘मनसे’चे आभार मानले आहेत.