चाकण मार्केट यार्ड मध्ये चक्रेश्वर भुसार सोयाबीन खरेदी विक्री केंद्राचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

चाकण-खेड तालुका कार्यक्षेत्रात ”सोयाबीन ” या शेतमालाचे मोठया प्रमाणावर उत्पादन वाढलेले आहे. परंतु शासकीय खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांचे हिताचे दृष्टीने – मालाचे योग्य वजन व विकलेल्या मालाच्या पैशाची हमी या साठी बाजार समितीने (दिं.9) रोजी मुख्य आवार खेड येथे “हुतात्मा राजगुरू सोयाबीन खरेदी – विक्री केंद्र ” सुरु केले आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी आता उपबाजार आवार चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड येथे ” श्री चक्रेश्वर भुसार सोयाबीन खरेदी – विक्री केंद्र उद्या (दिं. 21) रोजी सकाळी 10.00 वाजता खेड तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार दिलीप  मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते व माजी सभापती बाळशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व संचालक यांच्या उपस्थतीत संपन्न होणार आहे.

तरी या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

चाकण येथील सोयाबीन खरेदी -विक्री केंद्र दर बुधवारी व शनिवारी सुरु आहे.लिलाव सकाळी 11.00 वाजता सुरु होतील. याची सर्व शेतकरी बांधवानी नोंद घ्यावी असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous articleवाफगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ , एक लाख ७० हजारी जबरी चोरी चोरी
Next articleमनसे’च्या दणक्याने, ठेकेदाराने किराणा मालाचे दिले थकीत बिल