अक्षता कान्हूरकर यांची दक्षता समिती सदस्यपदी नियुक्ती

Ad 1

राजगुरूनगर-खेड पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समितीच्या सदस्यपदी अक्षता बाजीराव कान्हूरकर (रा. दावडी, ता. ,खेड) यांची नुकतीच नियुक्ती झाली. पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांच्या हस्ते त्यांना खेड पोलीस ठाण्यात नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्या वैशालीताई गव्हाणे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेड तालुका संघटक अमितकुमार टाकळकर, दक्षता समिती सदस्या रुपाली गव्हाणे, बीट अंमलदार संतोष मोरे, गोपनीय खातेप्रमुख संदीप भापकर, पोलीस हवालदार विक्रमसिंह तापकीर आदी उपस्थित होते.

कान्हूरकर या लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मॅजिक बस फौंडेशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आदी संस्थांवर कार्यरत आहेत. या सर्व संस्थांनी त्यांच्या निवडीबद्दल कौतुक केले.

दरम्यान दावडी येथील महालक्ष्मी मंदिरात ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच संतोष गव्हाणे, सोसायटी अध्यक्ष रामदास बोत्रे, तंटामुक्ती समिती अध्यक्षा वंदना सातपुते, दक्षता समिती सदस्या संगिता होरे, स्वाती शिंदे, ज्योती आमराळे आदी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षा समितीच्या माध्यमातून व ग्रामीण महिलांना दक्षता समितीच्या माध्यमातून सरंक्षण कवच उपलब्ध करून देऊ असा विश्वास कान्हूरकर यांनी व्यक्त केला आहे.