म्हाळुंगे तर्फे घोडा येथे बाहेर फिरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे कोरोनाचा रुग्ण सापडला होता त्यामुळे कोरोनाचे संसर्ग वाढू नये म्हणून मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार म्हाळुंगे तर्फे घोडा हे गाव,केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे .या क्षेत्रात विनापरवाना फिरण्यास बंदी असतानाही येथे बाहेर पडून संसर्गाचा प्रसार होईल असे वर्तन केल्याने एकावर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत असले तरी कोरोनाचा प्रसार वाढू नहे म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावच्या सीमा बंद केल्या आहेत कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून गावातील कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचार बंदीचे उल्लंघन करू नये असे आदेश असतानाही म्हाळुंगे तर्फे घोडा येथे शनिवार दि २० रोजी विनाकारण फिरणारे लक्ष्मण धोंडिबा कोकणे ( वय ६० )राहणार म्हाळुंगे तर्फे घोडा ता,आंबेगाव पुणे,यांच्यावर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेश पालन न करणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून या बाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे डिंभे बिट अंमलदार युवराज भोजने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

Previous articleपुणे जिल्हा युवासेनेचा संकल्प 10000 कुटुंबांना मोफत देणार आर्सेनिक अल्बम 30 औषधांचा लाभ
Next articleजवळे येथे ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या