पुणे जिल्हा युवासेनेचा संकल्प 10000 कुटुंबांना मोफत देणार आर्सेनिक अल्बम 30 औषधांचा लाभ

Ad 1

अतुल पवळे,पुणे-
शिवसेना नेते,युवसेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना पुणे जिल्ह्याचे वतीने आज खडकवासला मतदार संघातील कुडजे, मांडवी बु, मांडवी खु, आगळंबे, अहिरे,खडकवाडी, सांगरून, बहुली,जांबली, आंबी, सोनापुर,, वरदाडे, मालखेड, गोऱ्हे खुर्द ह्या गावांमध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या आदेशाने तळागाळातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य हित जपण्यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख व गोऱ्हे बु गावचे माजी सरपंच सचिन पासलकर यांनी जिल्हाप्रमुख रमेशबाप्पु कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील संपूर्ण ग्रामीण भागात स्वखर्चातून औषधे वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.संपूर्ण मतदार संघातील 10000 कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 औषधांचे मोफत वाटप युवासेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाप्रमुख रमेश बाप्पु कोंडे,उपजिल्हाप्रमुख महेश मते, पं स सदस्या सौ सीमाताई पढेर, मतदारसंघ प्रमुख नितीनदादा वाघ,तालुकाप्रमुख गणपतबुवा खाटपे,उपतालुकाप्रमुख संतोष शेलार,, युवासेना उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण वांजळे,युवासेना तालुका संघटक सौरभ मोकाशी, अविनाश सरोदे, अभिषेक मोकाशी,, संदीप काळे, सतीश घाटे, मोहनिश जाधव, योगेश चव्हाण,अर्जुन निवांगुणे, भारतीय विद्यार्थी सेनेचे अभिजित तावरे,दीपक सुर्वे,संतोष पढेर,रामदास गायकवाड,अक्षय मते,शिवकुमार कोणहलीकर,महेश निगडे व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख सचिन पासलकर,सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी पायगुडे, संदीप खिरीड,सरपंच गोऱ्हे बु लहू खिरीड, दशरथ खिरीड,निखिल खिरीड,मयूर पवार शिवसेना गोऱ्हे बु शाखा यांनी केले होते.

राज्यातील गंभीर परिस्तिथी मधेही शिवसेना सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीसारखीच अग्रेसर होती व पुढेही राहील अशी खात्री उपक्रमाचे कौतुक करताना रमेश बाप्पु कोंडे यांनी सांगितले तसेच संयोजकांचे अभिनंदन करताना अशाच अधिकाधिक समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन शिवसेना,युवासेनेचे वतीने करण्यात यावे असे सांगितले.