जवळे येथे ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

जवळे ता.आंबेगाव येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय रमेश भाऊ वाळुंज या व्यक्तीने राहत्या घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत त्याचा मुलगा अनिल वाळुंज यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दि,२१ रोजी फिर्यादी अनिल वाळुंज याचा वाढदिवस असल्याने तो साजरा करायचा म्हणून अनिल हा आपले वडील रमेश वाळुंज यांना बोलवण्यास गेला असता ते घराबाहेर न्हवते त्यानंतर त्यांचा फोन लावला असता तोही लागला नाही त्यामुळे ते कुठेतरी गेले असतील असे समजून अनिलने घरच्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला त्यानंतर दिनांक २२ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादीची आई घरामागील गाईच्या गोठ्यात गेली असता तिला जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाला रमेश वाळुंज यांनी गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत तिने मुलाला सांगितले असता मुलाने आजूबाजूच्या लोकांना व पोलीस पाटील यांना बोलावून घेतले पोलीस पाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना खाली घेत रुग्णवाहिका द्वारे मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून ते सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वीच मृत झाले असल्याचे सांगितले .या घटनेची फिर्याद अनिल वाळुंज यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास मंचर पोलीस पोलीस करत आहेत.

जाहिरात