अष्टविनायक महामार्गावरील देऊळगाव राजे हद्दीतील कामे मार्गी लावण्याची मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे परिसरातून अष्टविनायक महामार्गाचे काम सुरू आहे, सध्या हे काम संथगतीने सुरू आहे,या कामाची गती वाढावी,देऊळगाव राजे हद्दीतील विविध विकास कामे चांगल्या दर्जासह मार्गी लावावी यासाठी मा.सरपंच अमितदादा गिरमकर व ग्रामस्थांच्या वतीने अष्टविनायक महामार्ग चे उपअभियंता काबिले साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

देऊळगाव राजे हद्दीत आवश्यक ती कामे व्हावीत,गावातील रस्ता नियमाप्रमाणे व्हावा,नियमाप्रमाणे आवश्यक त्या सुविधा गावात कराव्यात या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले आहे, देऊळगाव राजे हे पंचक्रोशीतील केंद्रस्थानी असणारे गावं आहे या गावाशी आजूबाजूच्या गावाचा नेहमी संपर्क आहे त्यामुळे या गावातील विविध कामे मार्गे लावावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

या कामासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी श्याम काका अवचर,जालिंदर सूर्यवंशी,पोपोटभाऊ खोसरे, सुरेश कुंभार, भानुदास औताडे व इतर तसेच तरुण सहकारी गावचे पोलिस पाटील सचिन पोळ, दस्तगीर इनामदार सचिन माने, केशव गायकवाड,कैलाश खोसरें व इतर अनेक सहकारी तसेच गावातील सर्व पत्रकार बांधव यांचे सहकार्य लाभले.

 

Ad 3