वरुडे येथे “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी

राजगुरूनगर-महाराष्ट्र शासनाने कोविड १९ या महामारीवर मात करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२० पासून संपूर्ण राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत आपल्या गावातील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत दुसर्‍या टप्प्यात ( दि ,२०) रोजी वरुडे या ठिकाणी आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते .

या तपासणीसाठी कनेरसर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, आशा वर्कर ,वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

या आरोग्य तपासणी कामाचे उत्कृष्ट नियोजन वरुडे गावचे सरपंच मारुती थिटे, उपसरपंच सौ.आशाताई तांबे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक गिरी भाऊसाहेब, कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे यांनी केले

Previous articleअष्टविनायक महामार्गावरील देऊळगाव राजे हद्दीतील कामे मार्गी लावण्याची मागणी
Next articleलॉकडाऊन नंतर लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकरच