अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची क्षत्रिय मराठा परिवाराची मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड,

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तत्काळ विमा व आर्थिक मदत करावी या मागणीसाठी दौंड येथे क्षत्रिय मराठा परिवाराच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, आधीच कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी व इतर सर्व आर्थिक अडचणीत आले आहेत त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन तत्काळ मदत करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी क्षत्रिय मराठा पुणे जिल्हा प्रमुख वैभव सयाजीराव पाटील हे शेतकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये आले होते, राहुल देशमुख दौंड तालुका प्रमुख ,मनीषाताई लोंढे दौंड महिला प्रमुख,उदय पाटील विद्यार्थी जिल्हा प्रमुख, ओंकार मुटके दौंड युवक प्रमुख, प्रज्वल बांडे दौंड सोशल मीडिया प्रमुख, तसेच प्रतीक लोंढे तेजस लोंढे ,संग्रामजी विधाते ,गोरक्ष जाधव ,अभिषेक लिलके, इ मान्यवर आणि इतर सदस्य उपस्थित होते.