गावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या तीन तरूणांना अटक

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस बेकायदा बाळगून फिरत असलेल्या तिन तरूणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून पिस्तुल  काडतूस व दुचाकी असा एकूण ५५ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

          याप्रकरणी शुभम अनिल जगताप वय २३, रा. मोनिका प्लाझा जवळ, पापडेवस्ती, भेकराईनगर, ता.हवेली ), राज बसवराज स्वामी ( वय २३, रा. त्रिमुर्ती अपार्टमेंट, भेकराईनगर, फुरसुंगी ता.हवेली ) व ओमकार जयंत जोशी ( वय २०, रा. सिध्दीविनायक पार्क, वडकी ता.हवेली ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे यांना शनिवार ( १७ ऑक्टोबर ) रोजी सायंकाळी बातमीदारामार्फत उरुळी देवाची गावचे हद्दीत समता शाळेसमोर तीन इसम थांबले असुन त्यामधील एकाचे ताब्यात पिस्तुल आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.याची खातरजमा करण्यासाठी लोखंडे हे पोलीस हवालदार दिगंबर साळुके, अभिजीत टिळेकर व निलेश मगर यांना घेऊन सदर ठिकाणी गेले. व पाहणी केली असता त्यांना विद्यालयाचे समोरील बाजुस रोडचे कडेला तीन जण संशयास्पदरित्या गप्पा मारत थांबलेले दिसले. पोलीस त्यांचे जवळ गेले असता ते पळून जावू लागले. पोलीसांनी त्यांना पाठलाग करून जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता राज स्वामी याचे डावे कंबरेस आतील बाजुस खोवलेला एक गावठी पिस्तुल शुभम जगताप याचे पॅन्टचे उजवे खिशात एक जिवंत काडतूस मिळून आले तसेच सदर ठिकाणी एक होंडा डीओ दुचाकी क्रमांक एमएच १२ पीके २२७५ मिळुन आली. त्यांचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्तुल  बाळगण्याचे परवाण्याबाबत विचारणा करता त्यांनी त्यांचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे हे करत आहेत.