कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या च्या भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

सचिन आव्हाड

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ते काल पार पडले. यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर अनेकांनी रक्तदान केलं.

देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने कृष्णाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद नरुटे, संस्थापक उपाध्यक्ष शुभम ताटे, संस्थापक सचिव विजय झगडे यांनी हवामानाचा अंदाज घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं, याला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी अक्षय ब्लड बँक हडपसर येथील डॉ. अभिजित अहिरकर, डॉ. रुपेश दरेकर, डॉ. प्रशांत शिगवण, डॉ. सागर लोहकरे, डॉ. समाधान मानेदेशमुख यांनी उपस्थित राहून, नियोजन बंध रक्तदान शिबिर पार पाडले. यावेळी कृष्णाई कमिटीच्या वतीने राक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

Previous articleगावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या तीन तरूणांना अटक
Next articleनारायणगाव येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून चार दुकाने खाक ;५३ लाख रुपयांचे नुकसान