पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी

अमोल भोसले,उरुळी कांचन-महामार्ग ओलांडत असलेल्या एकास पिकअपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पडला तर पिकअप चालक जखमी झाला असल्याची घटना लोणी स्टेशन ( ता.हवेली ) येथे घडली आहे .

या अपघातात अब्दुल शकुरभाई शेख (वय ३४, रा. इनामदारवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली ) हे मयत झाले आहेत.

याप्रकरणी बाबाजान उमेदखान इनामदार ( वय ४२, ईनामदारवस्ती, लोणी काळभोर ता.हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पिकअप चालक प्रदीप रावसाहेब बोचरे ( रा.पाडोळी ता.जि.उस्मानाबाद ) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात रविवार ( १८ ऑक्टोबर ) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारांस घडला आहे.

अपघातातील मयत अब्दुल शेख हे लोणी स्टेशन चौकामध्ये पुणे – सोलापुर महामार्गावरून  त्याचेकडील ॲक्टीव्हा दुचाकी क्रमांक एमएच १२ क्युडी १०५६ हीवरून समतानगर कडे जाण्यासाठी घेवुन वळुन सोलापुर – पुणे महामार्गावर आले असता  सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे भरधाव वेगात निघालेल्या पिकअप गाडी क्रमांक एमएच २४ एयु २८१७ ने त्यांना जोराची धडक देवुन अपघात केला असुन अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. तर ॲक्टीव्हा वरील अब्दुल शेख याचे उजवे हातास डोक्यास व शरीरावर इतर ठिकाणी लहान – मोठ्या जखमा होवुन तो जागीच मयत झाले. तर  पिकअप चालक प्रदीप रावसाहेब बोचरे हे या अपघातात जखमी झाले आहेत.

Previous articleनिरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांची कोरोनावर मात
Next articleगावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या तीन तरूणांना अटक