ओढ्याच्या पाण्यात दुचाकी सह चौघे वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील राजेगाव-खानवटे रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्यात दोन दुचाकीवरील चौघे वाहून गेल्याने तिघांचा बळी गेला आहे,पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राजेगाव – खानवटे रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर अतीवृष्टी मूळे पुराच्या पाण्यामध्ये  शहाजी गंगाधर लोखंडे (वय 52वर्ष),सुभाष नारायण लोंढे (वय 48 वर्ष),अप्पासो हरीचंद्र धायतोंडे (वय 55 वर्ष),कलावती अप्पासो धायतोंडे (वय 48 वर्ष) हे चौघे वाहून गेले

यापैकी सुभाष नारायण लोंढे यांचा शोध सुरू आहे,बुधवारी रात्री हे चार जण दोन दुचाकीवरून खानवटे या गावी येत होते, पाऊस सतत पडत असल्याने परिसरात सगळीकडे पाणी साचले होते, अतिवृष्टी मुळे ओढ्याला पूर आला होता, वाढत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही गाड्यासह हे चौघे वाहून गेले

जाहिरात