आळंदी शहरात दररोज पाणी सोडावे अन्यथा नगरपरिषदे समोर आंदोलन करणार मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांचा इशारा

आळंदी- शहरात दररोज पाणी पुरवठा करावा अन्यथा नगरपरिषदे समोर करणार आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी देवाची शहराच्या वतीने जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे, तालुका अध्यक्ष मंगेश सावंत, तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.वैयजंता ताई उमरगेकर व मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब यांना आळंदी शहरामध्ये अस्वच्छ व दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दररोज नियमित करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी देवाची शहराच्या वतीने नगरपरिषदे समोर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आशा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष समिर थिगळे यांनी दिला आहे.

यावेळी उपमुख्याधिकारी तरकसे साहेब, मा.नगरसेवक अशोक उमरगेकर, शहराध्यक्ष निलेश घुंडरे पाटील, शहर उपाध्यक्ष किरण नरके,शहर सचिव प्रसाद बोराटे,शहर संघटक बाळु नेटके तसेच आळंदी शहरातील नागरिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleआळंदी नगरपरिषदत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Next articleओढ्याच्या पाण्यात दुचाकी सह चौघे वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू