आळंदी नगरपरिषदत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

आळंदी -भारत देशाचे दिवंगत राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती आळंदी नगरपरिषद येथे साजरी करण्यात आली.कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वाचन प्रेरणा दिनही साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आळंदी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी तरकसे साहेब, मा.नगरसेवक अशोक उमरगेकर, मनसे शहर अध्यक्ष निलेश घुंडरे पाटील, शहर संघटक बाळु नेटके,शहर सचिव प्रसाद बोराटे, शहर उपाध्यक्ष .किरण नरके व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व आळंदीतील नागरिक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Previous articleपावसाचा हाहाकार नि कर्तव्यदक्ष दौंड पोलिसांचा अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात
Next articleआळंदी शहरात दररोज पाणी सोडावे अन्यथा नगरपरिषदे समोर आंदोलन करणार मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांचा इशारा