कृषी सहाय्यक अधिकारी प्रमिला मडके यांची कोरोना वर मात

प्रमोद दांगट-आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरातील कुरवंडी येथे कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रमिला वाळकु मडके यांनी कोरोना या आजारावर यशस्वीरित्या मात केली असून त्या पुन्हा लवकरच आपल्या कामावर रुजू होतील.

कृषी विभागात कार्यरत असलेल्या प्रमिला मडके या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असतात तसेच कृषी विषयक असलेल्या विविध शासकीय योजना राबवण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोना झाल्याचे कळतात त्यांनी पिंपरी चिंचवड मधील खासगी रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून लवकरच शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुन्हा रूजू होतील.

कोरोना झाल्यानंतर घाबरून न जाता त्यावर मात करावी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोळ्या औषध घ्यावेत. कोरोना हा बरा होतो त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये व शासनाने दिलेल्या नियम व अटी पालन करावे असे आव्हानही कृषी सहाय्यक अधिकारी मडके यांनी जनतेला केले आहे.

Previous articleतुकईदेवी मंदिर नवरात्रात राहणार बंद
Next articleरस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता” वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरुन प्रवास करणे झाले ‘मुश्कील