तुकईदेवी मंदिर नवरात्रात राहणार बंद

राजगुरूनगर : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकईवाडी (ता.खेड) येथील श्री क्षेत्र तुकईदेवी मंदिर नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये,असे आवाहन श्री क्षेत्र तुकई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शंकर कोरडे, प्रशासक जीवन कोकणे, प्रविण कोरडे मा.उपसरपंच आणि तुकईवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

सध्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार यंदा तुकईमाता मंदिरात नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवात देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात तुकईदेवी फक्त पुजाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

Previous articleबाबाजी कोरडे यांचा एमडीआरटी पुरस्काराने गौरव
Next articleकृषी सहाय्यक अधिकारी प्रमिला मडके यांची कोरोना वर मात