रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता” वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरुन प्रवास करणे झाले ‘मुश्कील

गणेश सातव,वाघोली,पुणे

पूर्व हवेलीतील वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.सध्या वाघोली ग्रामपंचायतीच्या स्थानिक विकास निधीतून वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याचे साधारण १ कि.मी लांबीचे सिमेंट कॉंक्रिटीकरण सुरु आहे.काम सुरु होताना जवळूनचं पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता.परंतु पर्यायी रस्ता अगदी साधा असल्याने पाऊसामुळे या पर्यायी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

वाघोली आव्हाळवाडी रस्त्याचा व्हिडीओ

 

आधीचं रस्ता खराब आणि आता गेले दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पाऊसामुळे रस्त्याची फारच बिकट दुरावस्था झाली आहे.जागोजागी खड्डे त्यात चिखल व गाळाच्या राड्यामुळे नागरिकांना साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

वाघोली-आव्हाळवाडी परिसरात अलीकडच्या काळात गृहनिर्माण प्रकल्पाबरोबरचं वैद्यकीय, शैक्षणिक,व्यावसायिक प्रकल्पांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्याचबरोबर
परिसरात प्लॉटिंग व्यवसायामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे.अनेक वाहनांना पुणे-नगर रस्त्यावरुन सोलापूर महामार्गाला जाण्यासाठी हा महत्त्वाचा जोडमार्ग आहे.

कालच्या मुसळधार पाऊसामुळे तर या रस्त्यावरील खंडोबा मंदिर परिसरात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक वाहन चालक,आजारी रुग्ण व पदचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवीन रस्ता तयार होऊन वापरासाठी खुला होण्यासाठी अजुन बराच कालावधी असल्याने या पर्यायी रस्त्याची किमान चांगली दुरुस्ती तरी करावी अशी मागणी त्रस्त वाहनचालकांकडून होत आहे.

Previous articleकृषी सहाय्यक अधिकारी प्रमिला मडके यांची कोरोना वर मात
Next articleपावसाचा हाहाकार नि कर्तव्यदक्ष दौंड पोलिसांचा अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात