विकासपर्व रोहित दादा पवार प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश साकोरे यांची निवड

शिक्रापूर -आमदार रोहित दादा पवार यांच्या विचारांवर व युवा नेते रोहन दादा नलगे यांच्या नेतृत्वा खाली चालणाऱ्या विकासपर्व रोहित दादा पवार प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी केंदूर गावचे गणेश साकोरे यांची निवड करण्यात आली आहे.

कोरोना निर्मूलनासाठी साकोरे यांनी मोफत सॅनिटायझर वाटप जिल्हा परिषद शाळा मध्ये विविध साहित्य वाटप सामाजिक वृक्ष रोपण अशी अनेक सामाजिक कामे केली आहे व करत आहे त्यांच्या कामाची दखल घेत
गणेश साकोरे यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन नियुक्ती पत्र देण्यात आले

यावेळी त्यांनी मला दिलेल्या जबाबदारीला मी निश्चित पणे न्याय देण्याचं काम करेल व ही जबाबदारी समाजाच्या सेवेसाठी व्यथित करेल असे प्रतिपादन केले…संपूर्ण पुणे जिल्हा व महाराष्ट्र भरातून गणेश साकोरे यांचे अभिनंदन होत आहे..

Previous articleहवेली तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने उरूळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स, कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप
Next articleबाबाजी कोरडे यांचा एमडीआरटी पुरस्काराने गौरव