हवेली तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने उरूळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स, कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

 अमोल भोसले,उरुळी कांचन –

धर्माचे पालन करणे पाखांड खंडन !! हेचि आम्हां करणे काम बीज वाढवावे नाम !!

अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका कार्यकारिणी वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक एका साह्य करू” अवघे धरु सुपंथ संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जाण ठेवत कोरोणा विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन (ता.हवेली) येथील डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्गाला ५० पी पी ई किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुचिता कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन, प्रशासक एन. के.धापटे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, आरोग्य सहाय्यक नाना जाधव, जयप्रकाश शेळके, अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य संत वाडःमय प्रचार प्रसार प्रमुख आनंद महाराज तांबे, हवेली तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे, उपाध्यक्ष तुषार महाराज चौधरी, तीर्थक्षेत्र समिती प्रमुख सुरेश महाराज कांचन, युवासमिती प्रमुख चेतन महाराज शिंदे, मल्हारी महाराज गावडे, विलास महाराज उंद्रे, सदाशिव कामठे, दिनकर पिंगळे, अलका सोनवणे, सुनिता कुंजीर, शाम महाराज मरगज, दिंडी प्रमुख पोपट महाराज आव्हाळे, विनोद कांचन, महादेव कांचन, आनंद कांचन, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर, नर्स, सर्व कर्मचारी वर्ग, गावातील वारकरी मंडळी यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप आनंद महाराज तांबे यांनी केले वारकरी मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या संदर्भात व धेय्य धोरण याबाबत थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी. जि.प.सदस्य अशोक कसबे यांनी केले. तर आभार कार्यक्रमाचे आयोजक हवेली तालुका वारकरी मंडळ तीर्थक्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष हभप सुरेश कांचन यांनी केले.

Previous articleगॕस सिलेंडर मधून गॕस चोरी करणारी टोळी जेरबंद
Next articleविकासपर्व रोहित दादा पवार प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश साकोरे यांची निवड