बाबाजी कोरडे यांचा एमडीआरटी पुरस्काराने गौरव

राजगुरूनगर -भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून वाकळवाडी येथील विमा प्रतिनिधी बाबाजी कोरडे यांचा पिंपरी-चिंचवड, पुणे विभागातून विमा क्षेत्रातील जागतिक पातळीवरील मानाचा २०२०-२१ चा एमडीआरटी या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

बाबाजी कोरडे यांनी खेड तालुक्यातील अनेक गावांना विमा ग्राम पुरस्कार मिळवून दिले आहे. गेली १० वर्षे ते हा व्यवसाय करीत आहेत. त्यांना या कामात श्रीकांत टमके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या पुरस्काराबद्दल बाबाजी कोरडे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

Previous articleविकासपर्व रोहित दादा पवार प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश साकोरे यांची निवड
Next articleतुकईदेवी मंदिर नवरात्रात राहणार बंद