भीमाशंकर रोडवर रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक ; दुचाकीस्वार ठार

प्रमोद दांगट

शिनोली ते भीमाशंकर रोडवर गंगापूर फाटा येथे एम. एच.४३ बी. एफ.४६२६ या भरधाव रिक्षाने एम. एच.१४ ई. के.४४९१ या स्कुटी ला दिलेल्या जोरदार धडकेत स्कुटी चालक गंभीररीत्या जखमी झाला होता.दरम्यान या स्कुटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत तनवीर अकबर मुंडे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तनवीर मुंढे हे दि.११/१०/२०२० रोजी दुचाकीवरून घोडेगाव भीमाशंकर रोड गंगापूर फाट्याजवळ जात असताना त्यांना रस्त्यावरून एक व्यक्ती भरधाव वेगाने रिक्षा चालवत जाताना दिसली त्यावेळी समोरून स्कुटी वर येणारे अकबर अब्बास पठाण यांना रिक्षाने उडवले त्यावेळी फिर्यादी अकबर पठाण यांच्या जवळ जाऊन पाहिल्यास त्याच्या डोक्यातुन रक्त येत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आपल्या गाडीवरून रिक्षाचा पाटलाग केला व रिक्षा चालक उमेश एकनाथ बोऱ्हाडे (वय ३९, रा. चिंचोली ता. आंबेगाव जिल्हा पुणे) याला पकडून ठेवले तसेच त्याच्या मदतीने जखमी अकबर पठाण यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर काही उपचार करून डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टर यांनी त्यांना तपासून ते मृत झाले असल्याचे सांगितले. याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात रिक्षा चालक उमेश एकनाथ बोऱ्हाडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous articleअद्वैत क्रीडा केंद्राचे वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
Next articleटोकावडे ,कारकुडी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी