अद्वैत क्रीडा केंद्राचे वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

अद्वैत क्रीडा केंद्राचे वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला राज्यातून या स्पर्धेत ११९४ मुलांनी भाग घेतला होत. लॉकडाउन मुले घरात बसून बेचैन झाले होते परंतु मुलांचे मध्ये एक प्रकारचे आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती पारितोषिक विजेते विजय काटकर होते.

अद्वैत क्रीडा केंद्राचे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे, रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष फेरोज खान व युवराज दिसले हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मोजक्याच विध्यार्थ्यांना बोलावून या प्रसंगी पारितोषिके देण्यात आले. मनिषा धनंजय मदने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर धनंजय मदने यांनी या स्पर्धेचे संयोजन केल. संजय कांबळे, माउली खुडे, सुहास पाठक, लखन मोरे, हेमंत बारमुख, नरेश गांधी, संजय मरळ व प्रदीप काकडे असे मान्यवर या कार्यक्रम उपस्थित होते.

स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे
पहिला गट, इ.१ ते ४ थी- प्रथम क्रमांक – कु.आर्या अमित सुपेकर (पवार पब्लिक स्कूल हडपसर). द्वितीय क्रमांक – कु.अपुर्वा सागर नांदूरकर (संत विवेकानंद इंग्लिश स्कूल अहमदनगर). तृतीय क्रमांक – कु.पालवी निलेश जोशी (अभिनव विद्यालय एरंठवणा). उत्तेजनार्थ – कु.भार्गवी भास्कर बनसोडे (एन्जल हायस्कूल उरुळी कांचन). उत्तेजनार्थ- कु.हर्षल किरण नवले (ब्लू रिड्ज पब्लिक स्कूल, हिंजवडी)

दुसरा गट. इ.५ ते ७ थी, प्रथम क्रमांक – कु.स्मित संदिप पाटोळे (न्यु इंग्लिश स्कूल अहमदनगर).द्वितीय क्रमांक – कु.वैष्णवी चिंतामणी धुमाळ (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,परिचे). तृतीय क्रमांक – कु.प्रिती सिताराम देठे (श्री गोरेश्वर महाविद्यालय गोरेरगाव). उत्तेजनार्थ – कु.शांभवी बाळासाहेब खेडकर (महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन). उत्तेजनार्थ – कु.युगम अनिल नगराळे (फ्लाईंग बर्ड स्कुल कात्रज)

तिसरा गट – इ.८ ते १० वी – प्रथम क्रमांक – कु.सोनाली बहिरु डगळे (सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे अकोले).द्वितीय क्रमांक – कु.स्नेहल अर्जुन आव्हाड (श्रीमान गोकुलचंदाजी विद्यालय सह्याद्री कॉलनी कोपरगाव).तृतीय क्रमांक – कु.सिध्देश मारूती म्हस्के (महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन). उत्तेजनार्थ – कु.कनक नारायण ढोणे (एफ.आर.एंजल मल्टीपरपोस स्कूल वाशी).

Previous articleग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना स्वसंरक्षणासाठी शिट्टी व काठीचे वाटप;लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम
Next articleभीमाशंकर रोडवर रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक ; दुचाकीस्वार ठार