टोकावडे ,कारकुडी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी

राजगुरूनगर- संयुक्त ग्रामपंचायत टोकावडे/कारकुडी (ता.खेड) येथील नागरिकांची “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये २४७ कुटुंबातील ८२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.कोरोना विषयक जनजागृती देखील यावेळी करण्यात आली. यामध्ये कुणीही कोरोना संशयित सापडले नाही.सर्वांचे टेम्परेचर आणि आँक्सिजन लेव्हल चांगली आणि नाँर्मल आले आहे. अशी माहिती ग्रामसेविका अलका राहाणे यांनी दिली.

याचे सर्व श्रेय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या उपाययोजना सोडियम हायपोक्लोराईड फवारणी,साबण आणि हँडवाँश वाटप व याबद्दल जनजागृती तसेच सुरुवातीच्या काळात मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या ग्रामस्थांची तपासणी व होम क्वारंटाईन दरम्यान घेतलेली दक्षता आणि या सर्व बाबींचे ग्रामस्थांनी तंतोतंत केलेले नियमांचे पालन या सर्वांना जाते. याकामी मा.सरपंच सौ.वर्षाताई मेचकर, ग्रामसेविका अलका राहाणे मँडम यांनी मा. ग्रा.पं. सदस्य श्री.ज्ञानेश्वर जाधव, मच्छिंद्र वनघरे,शामल केदारी आणि टोकावडे पोलिस पाटील सौ.गीता मुर्हे, कारकुडी पोलिस पाटील भिमराव थोरात आणि आशासेविका यांच्या सहकार्याने वेळोवेळी सर्व कोरोना प्रतिबंधक उपक्रम राबविले.यामुळे आतापर्यंत आमच्या गावाला कोरोनाच्या भयानक संकटातून सुरक्षित ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.अशी माहिती अशी माहिती मा.उपसरपंच हरिदास कोकाटे यांनी दिली.

तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडून सर्व सर्व्हेक्षण टीमला आवश्यक साहित्य वितरण करण्यात आले.या मोहिमेसाठी केंद्रप्रमुख चिलेकर मँडम आणि श्री.कहाणे सर,माजी उपसरपंच श्री.हरिदास कोकाटे ग्रामसेविका अलका राहाणे,टोकावडेच्या पोलिस पाटील सौ.गीता मुर्हे हे उपस्थित होते.

सर्व्हेक्षणसाठी सहा पथकांची नेमणूक केंद्रप्रमुखांकडून करण्यात आली.त्यामध्ये टोकावडे शासकीय आश्रमशाळेचे श्री.गडगे सर ,श्री.डप्पडवाड सर,सौ. पिचड,सौ.लोखंडे,सौ.कासार,सौ.शेवंते मँडम आणि जि.प. प्राथमिक शाळेचे श्री.धराडे सर,श्री.साबळे सर,श्री.बळवंत सर,श्री.बेंडाले सर ,श्री. तिटकारे सर यांचा समावेश करण्यात आला.आरोग्यसेवक पवार , एएनएम सौ.मेंडके, अंगणवाडी सेविका सौ.हिराबाई मोरमारे, आशासेविका सौ.कांचन सावंत, सौ.रोहिणी गुरूनाथ केदारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी संतोष डामसे ,राजेंद्र थोरात यांनीही सहकार्य केले.

या सर्व्हेक्षणाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. याकामी ग्रामस्थांनी ही आलेल्या टीमला तपासणी करणे कामी उस्फूर्त प्रतिसाद देवून सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे कौतुक ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री जीवन कोकणे साहेब यांनी केले आहे.

Previous articleभीमाशंकर रोडवर रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक ; दुचाकीस्वार ठार
Next articleमहाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी ह.भ.प चेतन महाराज माथेफोड यांची निवड