सुभेदार संतोष पळसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने देऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर संपन्न

दिनेश पवार,दौंड

सुभेदार संतोष उर्फ बाळासाहेब प्रल्हाद पळसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिमन्यू गिरमकर मित्र मंडळाच्या वतीने देऊळगाव राजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रोटरी क्लब ऑफ दौंड,संजीवनी रक्त पेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरामध्ये एकूण 122 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


सुभेदार संतोष पळसकर हे देऊळगाव राजे चे सुपुत्र त्यांना गेल्या वर्षी जम्मू काश्मीर येथील लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे चिंताजनक परिस्थिती असताना देखील या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला यामुळे कोरोना काळात जी रक्ताची मागणी होत आहे त्यास उपाय म्हणून या शिबिराचा फायदा होणार आहे,यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,दौंड नगरपालिका चे जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव नाना काळे,त्रिदल सेवा संघाचे पदाधिकारी तसेच तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिमन्यू गिरमकर मित्र मंडळाचे सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.


सुभेदार संतोष पळसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरामुळे कोरोना सारख्या प्रादुर्भावात जो तुटवडा भासत आहे याला सहकार्य म्हणून या शिबिराचा नक्कीच फायदा होईल
– अभिमन्यू गिरमकर

Previous articleशेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याचा विचार करावा-रमेश थोरात
Next articleमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत कोयाळी तर्फे वाडा येथे आरोग्य तपासणी