शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याचा विचार करावा-रमेश थोरात

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना पाटस मधुकर नगर ,मागील दोन हंगामापासून बंद आहेत.यावर्षी तरी चालू करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दि 11 रविवार रोजी कारखाना कार्यस्थळावर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

कामगारांचे थकीत पगार तसेच ऊस उत्पादकांचे बिल त्याचप्रमाणे एफआरपी मिळावी यासाठी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाच्या विरोधात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

रमेश थोरात यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या वरती कडाडून टीका केली. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रुपये कारखान्याला देऊन सुद्धा कारखाना मागील हंगामा मध्ये सुरू होऊ शकला नाही तसेच यावर्षी सुद्धा कारखाना चालू होईल का नाही ही संभ्रमावस्था लोकांच्यात आहे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा, कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, पंचायत समिती सभापती आशा शितोळे, उपसभापती नितीन दोरगे, जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.