कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर घरपट्टीला सुट मिळावी उरळी कांचन ग्रामस्थांची मागणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना संकटाच्या काळात राज्यावर व देशावर आलेल्या कोरोना महामारी मध्ये लाँकडाऊनच्या काळात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या अनेकांचा रोजगार सुद्धा हिरावून घेतला गेला संकटाचा सामना करीत असताना अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आपल्या व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले अशा परिस्थितीत जीवन जगणे हे सामान्य माणसांना अवघड होऊन बसले आहे आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आपला देश महासत्ता बनेल असे सांगितले जात असताना कोरोना विषाणूच्या महामारी मुळे आपण वीस वर्ष मागे गेलो आहे त्यामुळे चालू वर्षाच्या घरपट्टी व पाणीपट्टी सह विविध करासह पूर्ण एक वर्षाची सूट मिळावी अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी उरुळी कांचनचे ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस यांना दिले.

 

याप्रसंगी उरुळी कांचनचे माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, भाजपा हवेली तालुका सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष सुनील तुपे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बगाडे, संदीप कांचन, आदेश तुपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleबौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधावडे यांचे निधन
Next articleदौंडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालय व घरासमोर आक्रोश आंदोलन