बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधावडे यांचे निधन

Ad 1

राजगुरूनगर ( पुणे ) : चाकण येथील बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सदाशिव दुधावडे गुरुजी ( वय.६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते महेंद्र व आदर्श पत्रकार अविनाश दुधावडे यांचे ते वडील होत.

खेड तालुका बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पद १० वर्षे यशस्वीपणे संभाळले असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई यांची त्यांची दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.मनमिळाऊ स्वभाव असल्याने त्यांच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात